Latest technology news and Review, Motivational Quotes, use of Online learning techniques to improve self-studies about Deep Learning and AI. Benefits of Sahajayoga meditation and experiences

Full width home advertisement

Technology

Entertainment

Post Page Advertisement [Top]


                          
                   दारुडा पुणेकर





बायको

     

    आम्ही २०१२ साली पुण्यात निघोजकर हॉल मध्ये दररोज दिवसभर, " लास्ट जजमेंट " नावाच्या नाटकाची रिहर्सल करत असे. एक  जेमतेम ४५ वर्ष वय असणारा गणेश पुणेकर नावाचा रिक्षावाला बेवडा इसम दररोज तिथे निमंत्रण दिल्यासारखा दिवसभर आमच्यासोबत नाटकाची तालीम पाहत  बसलेला असे. मी हा माणूस कोण आहे ह्याबद्दल चौकशी केली असता  कुणीतरी मला सांगितलं कि, हा  "गण्या पुणेकर" म्हणजे पक्का दारुडा दिवसभर फक्त  दारू आणि सिगारेट ह्यातच झिंगलेला असतो. त्याची एक खूप जुनी १९८५ ची रिक्षा होती त्यामध्ये  दारूच्या दुकानात येतो तसा दारूचा वास दरवळत असे. दारूच्या वासामुळे  कुणी त्यात बसण्यासाठी धजत नसे  त्यामुळे त्याची रिक्षा सहसा तो आमच्यासारख्या हौशी कलाकारांच्या नाटकांचे सेट वेगवेगळ्या नाट्यगृहापर्यंत पोहचविण्याचे काम करत असे. मी बरेच दिवस पाहत होतो ह्या   बेवड्या पुणेकर कडून  लहान-लहान मुले सुद्धा  गाढवासारखं  काम करून   घेत आणि हा लाचार प्राणी दारूच्या आशेने सांगेल ते काम करत असे.  काम करून घेण्याबद्दल मला काही वाटत नसे परंतु मी बऱ्याच वेळा पाहिले  कि, ह्या पुणेकर ला जास्त झिंगलेला असताना  कुणीही येऊन चापटा मारत असे . मी एक-दोन वेळा असे त्याला कुणी मारत असताना  हटकून विचारले सुद्धा कि, " विनाकारण  का मारताय त्याला तो सांगेल ते  काम करतोय ना तुमच" ?  तर मला त्यांच्याकडून उत्तर असे मिळाले कि, "नशेत  ह्याला मारलेलं कळत नाही त्यामुळे त्याची उतरावी म्हणून आपला हात धुवून घ्यायचा ".  मला ह्याच खूप वाईट वाटायचं  पण खरंच ह्या माणसाच्या जीवनात काही अर्थ नव्हता. तो  दिवसभर ह्या नाहीतर त्या हॉल मध्ये दारू आणि पैश्याच्या आशेने फिरायचा आणि मग हे सो-कॉल्ड  हौशी कलाकार त्याचा गैरवापर करायचे.  तो नेमका नाटकाची  तालीम सुरु असताना येऊन थांबायचा  मग त्याला कितीही हाकलले तरी तो जायचा नाही. तो नशेत असल्यामुळे आमच्या नाटकामध्ये  काम करणाऱ्या  मुली घाबरायच्या  आणि त्याला हाकलले तर  तो तिथून निघून जाण्यासाठी १० रुपये द्या दारू प्यायला असे  म्हणायचा .  मग कुणीतरी १० रुपये दिले कि, त्याची दारू पिऊन दुसरा हॉल म्हणजे निघोजकर हॉल मधल्या पोंरानी हाकलून लावले कि,  तो प्रभात टॉकीज समोरच्या बोळात असणाऱ्या वर्तक हॉल मध्ये तिथे नाटकाची तालीम करणाऱ्या कलाकारांना पिडायला  जायचा.
              हे असे मागील १०-१५ वर्षांपासून सुरु होते असे निघोजकर वाड्याच्या बाहेरील  चहा  टपरीवाला एकदा मला सांगत होता. त्याला मी विचारले कि, "ह्यांची फॅमिली कुठे असते ? ",  तर तो म्हणाला, " अश्या बेवड्यासोबत कोण संसार करणार ? ".   हेच नाटक करणारी मंडळी म्हणजे त्याचा संसार,  अन  दारूची दुकाने म्हणजे त्याची फॅमिली.  कोणत्याही नाटकाची तालीम सुरु असताना ह्या पुणेकर ला कुणीही, "जा रे पुणेकर चहा  घेऊन ये" , म्हणून पाठवितो आणि हा बेवडा इथे येतो आणि मला  चहा  ची ऑर्डर देऊन. माझ्या गिऱ्हाइकांपैकी कोण सिगारेट ओढत आहे ते पाहून त्याच्या तोंडातील उष्टी सिगारेट मागून  ती सुलगावात बसतो.  त्याचे  ऐकून  मी म्हणालो, "अरे देवा काय हा माणूस " , तर तो चहा टपरीवाला म्हणाला  अहो साहेब , खरी गम्मत तर पुढे आहे हा गण्या पुणेकर चहा घेऊन अजून का आला नाही म्हणून तो ,  "जा रे पुणेकर चहा  घेऊन ये"  म्हणालेला १६-१७ वर्षाचा पोरगा वैतागून येतो आणि ह्याच्या कानशिलात - ओढून जातो.  हे असे मी रोज पाहतो मलाहि खूप वाईट  वाटते, पण करणार काय ?  ते म्हणतात ना,  "जित्याची खोड"  तसा प्रकार आहे बघा .  
                  मी माझ्या ग्रुप  मधल्या पोरांना ह्या पुणेकर ची  मला खूप कीव  येते आणि त्याला आपण कोणत्या प्रकारे मदत करू शकतो ह्यावर चर्चा केली . मग आम्ही ठरविले कि, त्याला आपल्या सोबत  ठेवू  म्हणजे मग बघू कुणाच्या बापाची हिम्मत होतेय त्याला विनाकारण मारायची. त्या दिवसापासून दररोज आम्ही ह्या गण्या पुणेकर ला  काही ना काही खायला देऊ लागलो आणि त्याची काळजी घेऊ लागलो. हळू-हळू माझी आणि त्याची मैत्री झाली, बघता बघता तो आमच्या नाट्य ग्रुप मधला एक मेंबर झाला. सुरुवातीला आम्ही त्याला बॅकस्टेज  ची कामे देऊ लागलो पण हा मनुष्य  तर  सतत टाकून असायचा. काही दिवसांनी आम्ही  मित्रांनी ठरविले कि,  ह्या पुणेकर ची दारू -सिगारेट आणि बाकी सारी व्यसने सोडवून टाकली पाहिजेत . मग आम्ही रोज ठरवून त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करीत होतो , शिवाय  आम्ही त्याला,  दारू सोड आणि जरा माणसात ये मग आम्ही तुला एखादी नवीन रिक्षा घेऊन देऊअसे  आमिष हि दाखवून पहिले . परंतु  उलट हा बेवडा आम्हालाच  म्हणे कि, “हि जुनी रिक्षा म्हणजे माझी  बायको आहे, माझी लक्ष्मी आहे ” , एव्हडेच नाही तर तो आम्हाला दरडावून म्हणे कि , "खबरदार हिच्यासाठी कुणी सवत आणायचा प्रयत्न कराल तर ".  शिवाय पुढे हा माजुरडा मनुष्य   आम्हाला म्हणाला , "मला नको तुमच्याकडून काही आणि माझ्या बायकोला,  "मी"  पिता तिच्याकडे आलेलो अजिबात आवडत नाही ".  काही जुनी माणसे  जे ह्या दारुड्याला ओळखत होती, ती आम्हाला सांगायची कि, “ हे सुधारणार जनावर नाहीये तुम्ही लोक उगी कशाला वेळ वाया घालविताय ?”.  तर आम्ही म्हणायचो, आज नाही तर उद्या  हा सुधरेल म्हणून आम्ही सर्व प्रकारचे प्रयत्न सुरूच ठेवले. पण हा माणूस आमच्यासमोर,  हो-हो,  आता आज जे पिलो ते शेवटचं पिलो ,  इथून पुढे अजिबात पिणार नाही”, "जान जाये पर वचन जाय ". अश्या बाता मारायचा आणि परत दुसऱ्या दिवशी झिंगतच  यायचा.  तो बऱ्याच वेळा त्या रिक्षा समोर उभे राहून तिला बोलायचा  आणि आम्हाला सांगायचा  कि,  ती रिक्षा त्याच्याशी बोलते .  आम्ही तो नशेत आहे म्हणून त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचो .  कसे आहे,  "एकवेळ माणूस मरेल पण दारू सोडणार नाही "  हा एक अलिखित सिद्धांतच आहे.  पण आमचा ग्रुप सुद्धा मागे हटणाऱ्यांपैकी नव्हता आम्ही जवळजवळ ह्या माणसाला वर्ष सुधरविण्याचा प्रयत्न केला.  काय साला त्याची लाईफ, "ती जुनी रिक्षा म्हणजेच त्याच जग, घर, बायको, त्याचा संसार आणि दारू पिणे म्हणजे त्याचा जन्मसिद्ध अधिकार".  एक शेवटचा पर्याय म्हणून आम्ही त्याला आमच्या जवळच्या पैश्यातून  साताऱ्यातील  व्यसनमुक्ती केंद्रात महिन्यांसाठी पाठवून दिले.  जाताना त्याने त्याच्या बायकोला (रिक्षा) इथेच नेहमीच्या ठिकाणी पार्क केले आणि आम्हाला सांगितले कि, हिच्याकडे लक्ष दया.
          बघता बघता महिने झाले त्या दरम्यान आमच्या ग्रुप मधल्या एका मेंबर चा थोरला भाऊ देवाघरी गेला.  खरे तर ह्याच माणसाची पुणेकर नीट होण्यासाठी  धडपड होती  कारण त्याने लहानपणापासून दारूमुळे उध्वस्त झालेले संसार आणि माणसे खूप जवळून पाहिली होती.  त्याच्या सतत च्या दारूविरोधी  प्रेरणा दायक  बोलण्यामुळे पुणेकरला  सुधरविण्याचा जणू  आम्ही  सर्वानी  पणच केला होता.  म्हणून तर  आम्ही -१० दिवसातून एकदा वेळ काढून ह्या दारुड्याला भेटायला त्या व्यसनमुक्ती केंद्रात जायचो आणि त्याची प्रगती पाहायचो. ह्यावेळी आमचा तो मित्र   सोबत दिसला नाही म्हणून ,  तो सोबत का नाही आला,  हे पुणेकर ने विचारल्यावर आम्ही त्याचा थोरला भाऊ गेला असा निरोप त्याला दिला.  हा दारुडा  तेंव्हा शुद्धी मध्ये होता त्यामुळे  म्हणाला कि, “मी बाहेर आल्यावर  पहिल्यांदा त्याला भेटायला जरूर जाईन, कारण त्याचे माझ्यावर खुप  उपकार  आहेत . माझी मागील २५-३० वर्षांपासून असणारी सर्व  व्यसने ह्या देव माणसामुळे निघून गेली आता मी नव्याने माझे जीवन सुरु करणार आहे.
        एकंदरीत पुणेकर सारख्या दगडामध्ये  मध्ये झालेली प्रगती पाहून  आणि  सलग महिने विना दारू/सिगारेट तो राहिलेला पाहून  व्यसनमुक्ती  केंद्राच्या  मॅनेजर ला भेटून त्यांचे मनापासून आम्ही सर्वानी आभार मानले.   त्या मॅनेजर ने  सुद्धा आम्हाला पुणेकर पुढील महिन्यात कायमचा निर्व्यसनी होणार याची शास्वती दिली.  मनापासून  वेगळीच ऊर्जा  आत्मसात केल्यासारखे  आम्हा सर्वाना  आम्ही पुणेकर ला  ह्या केंद्रात दाखल करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल  त्या दिवशी पहिल्यांदा  वाटत होते.  कसलातरी "शब्दात मांडता येणारा " वेगळाच  आनंद वाटू लागला होता  कारण  आमच्या  ग्रुपच्या एका चांगल्या निर्णयाने हे एक जनावर माणसात येत आहे असे आम्हाला समोर दिसत होते .  शिवाय आमच्या प्रयत्नांना यश मिळत  आहे याचा आम्हाला खरंच मनापासून अभिमान वाटत होता.  बघता-बघता महिने झाले आणि आम्ही आमच्या नवीन, "निर्व्यसनी  गणेश पुणेकर " ला त्या व्यसनमुक्ती केंद्रातून परत आणण्यासाठी गेलो .  तो सुद्धा खूप आनंदी होता, आता दगडूशेट  गणपती चे दर्शन घेऊन नव्याने सुरुवात करू असा निश्चय करून तो आमच्यासोबत  निघाला. आम्ही डायरेक्ट दगडूशेट गणपती चे दर्शन घेऊन ह्याला ह्याच्या रिक्षा जवळ आणून सोडले. कारण, त्याला कधी एकदा त्याच्या  बायकोला म्हणजे रिक्षा ला भेटेन असे झाले होते .  त्यांना दोघांना  एकांतात सोडून आम्ही आपापल्या कामाला  निघून गेलो.
                सायंकाळी वाजता ग्रुप मधील आम्ही सर्वजण  एकत्रित येऊन केक कापून  आनंद साजरा करणार होतो.  त्यामुळे आम्ही सर्वजण . ३० वाजताच ठरलेल्या ठिकाणी जमा झालो. सर्व तय्यारी झाली होती आणि इतक्यात एकजण ओरडतच  आला आणि म्हणाला कि, “ आता  कशाचे सेलिब्रेशन करणार आहोत आपण ? अरे तो गण्या बेवडा पिऊन टाईट  झालाय आणि त्याची स्वारी इकडेच येत आहे झिंगत.  आम्हाला ह्या गण्या पुणेकर ला पहिल्याच दिवशी पिऊन आलेला पाहून खूप राग आला त्यामुळे आम्ही संतापून त्याला याचा जाब विचारला.  त्या दिवशी आम्हाला समजले कि, कोणत्याही दारुड्याला दारू पिण्यासाठी काहीही कारण चालते आणि कारण नसेल तर त्याला पाहिजे असे कारण बनवून तो आपली प्यायची ती पितच असतो.  गण्या पुणेकर ने तो का पिलाय याचे कारण आम्हाला सांगण्यासाठी काय-काय नाटक केले हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही . आम्हाला असे अपेक्षित होते कि, ज्या मित्राचा थोरला भाऊ देवाघरी गेलाय  त्याच्या घरी जाऊन  गण्या त्याचे सांत्वन करेल तर झाले दुसरेच.  तो म्हणे कि,  मी आज परत  दारू पिण्यामागील मुख्य कारण म्हणजे मी मागील महिने इथे नव्हतो तेंव्हा कुणीही माझ्या  बायकोला विचारलं नाही शिवाय  "पुसले"  सुद्धा नाही.  आता आम्हाला प्रश्न पडला कि ह्या निर्जीव भंगार  रिक्षाची विचारपूस कशी करावी ?.  हा बेवडा फुल्ल ऍक्टिव्ह मोड मध्ये होता  एवढ्यावरच थांबता तो आम्हाला म्हणे कि, “काय राव तुम्ही लोक ?  वेळ काढून  तिला विचारलं सुद्धा नाही बघा तिच्या अंगावर किती धूळ आहे “. निर्लज्जपणाचा कळस म्हणजे तो आम्हाला म्हणे, “ ह्या धुळीने माखलेल्या माझ्या रिक्षाने मला सर्व काही सांगितले (जसे काही रक्ताने माखलेल्या रिक्षाने अश्या अविर्भावाने हा बेवडा आमच्यासमोर  त्याच अर्धवट ज्ञान  पाजळत होता).  आता ह्याच्या ह्या जुन्या भंगार रिक्षा ला कुणी पुसावे रोज रोज ?  पण म्हणतात ना दारुड्याला काहीही कारण चालते तसेच ह्या गण्या पुणेकर ने ह्या रिक्षा नावाच्या भंगार  बायकोने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून आम्हा सर्व लोकांच्या  आजवर केल्यावर उपकारांवर धूळफेक केली होती .  खरे तर   ह्या भल्या लोकांच्या मुळेच   आपण  आज माणसात येणार होतो, पण तरीही, “आपल्या  ह्या निर्जीव रिक्षावर ची धूळ साफ नाही केली,  ह्या एका शुल्लक  कारणामुळे आपण परत जनावरात सामील होतो आहे, असा ह्या गण्याने जराही विचार केला नाही.  खरे तर आमच्या ग्रुप मधील आम्ही सर्वजण IT  मध्ये काम करणारी आणि रिकाम्या वेळेत समाजसेवा आणि  हौस म्हणून नाटक करणारी  साधी सरळ माणसे होतो.

                  आमच्या मनाचा मोठेपणा होता म्हणून  आम्ही असा विचार केला  कि , आपल्यामुळे हा माणूस सुधरेल तर हा उलट आम्हालाच सुधरविण्याच्या दिशेने दारू पिऊन पाऊले टाकत होता.  तेंव्हापासून आम्ही आमच्या कानाला खडा लावला आणि सर्वानी अगदी हृदयापासून ठरविले कि,  इथून पुढे दारू पिणाऱ्या माणसांच्या सावलीला सुद्धा थांबायचे नाही आणि  चुकून सुद्धा  दारुड्याना  आपल्याही सावलीला उभे करायचे नाही “.  कारण दारुडी माणसे दारू पिण्या आधी पर्यन्त त्यांना कितीही मदत करा ते दारू ढोसल्यावर क्षणात विसरून जातात आणि त्यांच्या नशेडी जगातलेराजेहोतात आणि  समोरच्यांना आपली लाचारप्रजासमजायला लागतात .  तिथून पुढे आम्ही ह्या गण्या पुणेकर ला अजिबात जवळ केले नाही.  अधून-मधून आमच्याच फ्रेंड सर्कल मधील कुणीतरी  त्याला चुकून भेटला तर  तो त्यांच्याकडे हेच नेहमीचे  दारू परत पिण्यामागचं कारण  सांगायचा. तो सरळ सांगायचा कि, आम्ही  (म्हणजे आमच्या ग्रुप मधील) लोक  किती पापी आहोत त्याच्या बायकोकडे तो नसताना लक्ष दिले नाही. पण सर्वजण त्याच्याकडे तो बेवडा असल्यामुळे "हो-हो, बर-बर, हा-हा” असे करून दुर्लक्ष करायचे.
      आपला  वापर करून झाल्यावर आपलीच बदनामी करणाऱ्या अश्या ह्या पुणेकर सारख्या  लोकांबद्दल   राहवून  माझ्या मनात नेहमी  असे अनेक प्रश्न  यायचे,  वाटायचं की ,  यार खरंच का ह्या समाजात निरपेक्ष प्रेम करणे गुन्हा आहे? खरंच आपण ह्या गण्या पुणेकर ला आपल्या  अगदी व्यस्त शेड्युल मधून बहुमोल  वेळ रोज दिला ती चूक होती  का ?  हे असे लोक  का  क्षणात   विसरून जातात कि, समोरील माणसाला सुद्धा  मन नावाची संस्था असेल आणि त्यांचे ते मन दुखावेल ?  ह्यांच्यासाठी कितीही काहीही केलं तरी ह्यांना जशी वागणूक  द्यायची आहे  तशीच हे लोक  आपल्याला का देतात ? खरंच लोकांच्या मेंदू मध्ये पाणी झालय आणि हृदयाचा दगड बनलाय  का ?

असो शेवटी संस्कार !!!  

      आपण आपलं निरपेक्ष प्रेम करत राहायचं भले त्या बदल्यात समोरच्यानं दगड जरी मारली तरी  ती दगड  फुल  समजून त्याचा आनंद घ्यायचा ....कारण लहानपणापासून आपण ऐकत आलोय  …….
खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे ।।
जगी जे दीन अति-पतीत, जगी जे पद-दलीत
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे ।।१।।
             हे पण खरे आहे कि,  परमेश्वर सर्वाना केलेल्या कर्मांची फळे बरोबर देत असतो. असेच एकदा आम्ही अलका चौकातून  गुडलक कॅफे कडे जात असताना तिथे गटाराजवळ खूप गर्दी पाहिली  आणि नेमका  काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी आम्ही आमच्या बाइक्स बाजूला लावून पाहतो तर काय , हा गण्या पुणेकर आपल्या बायकोसोबत म्हणजे त्या भंगार रिक्षा सोबत त्या गटारात पडलाय आणि नाकातोंडात पाणी गेल्यामुळे पिलेली उतरली असावी त्यामुळे त्याने आम्हाला पाहून एक आर्त  हाक मारली.  अहो दादा प्लिज , " मला घेऊन चला " आमच्यापैकी एक मित्र त्याला म्हणाला,  आता बेवडे पुणेकर,  तुमची ह्या गटारातच गपचूप घाला.  मला पुणेकरची थोडी कीव येत होती पण तरीही आम्ही तिथून निघून गेलो.

सूचना - सदर कथा हि सत्य  घटनेवर आधारित असून कोणत्याही प्रकारचे साम्य आढळल्यास शुद्ध योगायोग समजावा.
लेखन-अनिल पिसे.
                                               

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]